कमाल खान यांच्या अशा प्रकारे जाण्यानं मी हतबुद्ध झालो आहे. केवळ मीच नाही, तर त्यांना ओळखणारे लाखो-कोट्यवधी टीव्ही प्रेक्षकही!
हे विष प्राशन करण्याचा शाप असलेल्या भारतीय समाजासाठी कापणाऱ्या हातांनी मधाच्या थेंबासाठी झटणाऱ्या भारतीय पत्रकारितेचंही नुकसान आहे. कमाल खान यांचं असं अचानक जाणं, हे व्हेंटिलेटरच्या टेबलावर बेशुद्ध पडलेल्या उत्तर प्रदेशच्या कोविडीय पत्रकारितेचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्यासारखं आणि त्यांचा विरह डायलिसिसच्या टेबलावर किडनी फेल भारतीय लोकशाहीच्या हिमोग्लोबिनची पातळी अचानक कमी होण्यासारखं आहे!.......